‘स्वाधार योजना’ सरकारच्या निधीपासून दूर तीन वर्षांपासून प्रतिक्षेत ः लाभ कधी मिळणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वाधार योजना’ सरकारच्या निधीपासून दूर


तीन वर्षांपासून प्रतिक्षेत ः लाभ कधी मिळणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित
‘स्वाधार योजना’ सरकारच्या निधीपासून दूर तीन वर्षांपासून प्रतिक्षेत ः लाभ कधी मिळणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित

‘स्वाधार योजना’ सरकारच्या निधीपासून दूर तीन वर्षांपासून प्रतिक्षेत ः लाभ कधी मिळणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत पदवीच्या पहिल्या वर्षी २०२० मध्ये अर्ज भरला होता. पहिल्या वर्षाचा पहिला हप्ता १८ मे २०२२ मध्ये मिळाला. आता पदवीचे तिसरे वर्ष सुरू झाले असून अद्याप लाभ मिळालेला नाही. याबाबत विचारणा केली असता, सरकारकडून निधी मिळाला नसल्याने लाभ देण्यास अडचण आहे. त्यामुळे १५ दिवसांनी चौकशी करा, असे सांगितले जाते, असे काजल वाघमारे या विद्यार्थिनी सांगते. पहिल्या वर्षाचा पूर्ण लाभच मिळाला नाही, तर उरलेल्या दोन वर्षांचा लाभ कधी मिळणार ? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

समाज कल्याण विभागाकडून ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतून आर्थिक आधार मिळतो. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना लाभ देता आला नाही. त्यासाठी निधी नव्हता, असे अधिकारी सांगत होते. देशातून कोरोना जवळपास हद्दपार झाला आहे. तरी या योजनेचे गृहण सुटेना, अशी अवस्था आहे. अर्जामध्ये आलेल्या त्रुटीही यांना पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत, असे अमोल भगत या विद्यार्थ्याने सांगितले. याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

स्वाधार योजनेचा अर्ज भरून महिना झाला आहे. अर्जात त्रूटी निघाली होती. त्रुटीही पूर्तता केली आहे. मात्र, या अर्जाचे पुढे काय झाले, याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे नेमका लाभ मिळणार की नाही, हे समजत नाही. अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. तसेच लाभ द्यावा.
- उषा पाटोदे, विद्यार्थिनी

फेब्रुवारी २०२२ मध्ये अर्ज दाखल केला आहे. मात्र, पात्र यादीत नाव आलेले नाही. याबाबत विचारणा केली तर फेब्रुवारी महिन्यातील अर्जांची तपासणी झाली नसेल म्हणून नाव दिसत नसावे, १५ दिवसांनी या, असे उत्तर दिले जाते. प्रत्येकवेळी हेच उत्तर मिळत आहे.
-तेजल वाघमारे, विद्यार्थिनी


सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रूटी आहेत. त्या त्रृटींची पूर्तता झाल्याशिवाय लाभ मिळणार नाही. मात्र एकच कर्मचारी असल्याने या प्रक्रियेला वेळ लागत आहे. तसेच फक्त २०२०-२१ या वर्षातील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल, असे अधिकारी सांगतात.
- राजरतन बलखंडे, विद्यार्थी


विद्यार्थ्यांचे प्रश्न...
- योजनेला लाभ मिळण्यासाठी किती वेळा आंदोलन करावे
- २०२० या वर्षातील विद्यार्थ्यांना लाभ कधी देणार
- विद्यार्थ्यांची अजून कितीकाळ फसवणूक करणार
- मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना न्याय देणार का
- मागास विद्यार्थ्यांसाठीच सरकारकडे निधी का नाही

काम करा अन्यथा खुर्च्या खाली करा
समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे काम होण्यास उशीर होतो, असे सांगितले जाते. मात्र, कर्मचारी कामात टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. नीट उत्तरे देत नाहीत. कामाची जबाबदारी घ्यायची नसेल, तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97626 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..