‘ओणमसंध्या’ फूड फेस्टिव्हल उद्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओणमसंध्या’ फूड फेस्टिव्हल उद्या
‘ओणमसंध्या’ फूड फेस्टिव्हल उद्या

‘ओणमसंध्या’ फूड फेस्टिव्हल उद्या

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः केरळमधील नागरिकांचा सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे ओणम. देशातच नव्हे, तर जगभरात ओणम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याचे औचित्य साधून डेक्कनवरील ‘द सी सिक्रेट हॉटेलमध्ये ८ सप्टेंबर रोजी खास ‘ओणमसंध्या’ हा फूड फेस्टिव्हल आयोजित केला आहे, त्यात २३ प्रकारचे विविध पक्वान्न आणि पदार्थांचा समावेश असेल.

मराठी नववर्ष जसे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते, तसे केरळवासियांचे नववर्ष ओणमपासून सुरू होते. केरळमध्ये चिंगम नामक महिन्याच्या शुद्ध पक्षात श्रवण नक्षत्रावर ओणम साजरा करण्याची पद्धत आहे. ओणम सणासाठी घरांना रंग देऊन दर्शनी भाग फुलांनी सजविला जातो. घरासमोर बहुरंगी रांगोळी काढतात. पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओणमसंध्या या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही. तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, ओलण, रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू म्हणजे ताक यांनाही फार महत्त्व आहे.

‘द सी सिक्रेट’मध्येही ओणम उत्साहात होणार आहे. ओणमसंध्याचा आस्वाद ग्राहक ४९९ व पार्सलसाठी ६४९ रुपयांत घेऊ शकतील. ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत असेल, यासाठी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बुकिंग स्वीकारले जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97791 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..