अमली पदार्थविरोधी कायदा काय सांगतो, येरवडा कारागृहात कैद्यांसाठी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थविरोधी कायदा काय सांगतो, येरवडा कारागृहात कैद्यांसाठी शिबीर
प्रमुख जिल्हा न्यायाधीश (पुणे) संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन झाले.

अमली पदार्थविरोधी कायदा काय सांगतो, येरवडा कारागृहात कैद्यांसाठी शिबीर

क्षणिक मोहापायी, आर्थिक हव्यासापोटी, नशेच्या आहारी गेल्याने बरेच जण बेकायदा व्यापार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या/टोळ्यांच्या जाळ्यात अडकतात. अशी कामे करणारे लोक सहसा कष्टकरी वर्गातीलच असतात. अगदी सामान्य, गरीब, मजूर, वाहन चालक, परिस्थितीने गांजलेले लोकच, या अवैध धंद्यातील हे सर्वात धोकादायक काम करायला जुंपले जातात, असे मत अमली पदार्थ विरोधी कक्षाचे अधीक्षक मदन देशमुख यांनी व्यक्त केले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट(पुणे), अमली पदार्थ विरोधी कक्ष, सीमाशुल्क आयुक्तालय (पुणे) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच येरवडा कारागृह, पुणे येथे अमली पदार्थ विरोधी कायदे (NDPS) आणि त्या अंतर्गत कैद्यांचे पुनर्वसन यासंबंधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशमुख बोलत होते. 'या अवैध धंद्यात काम करणाऱ्यांना हा कायदा, त्यातील तरतुदी, शिक्षेची गांभीर्य याविषयी बहुतांश वेळा काहीही कल्पना नसते. पण एकदा का कायद्याची मिठी पडली की, मग यांची आयुष्ये उध्वस्त होतात. अशा परिस्थितीत या विषयी या आरोपी किंवा गुन्हेगारांना कायद्याची कधीतरी माहिती होणं अतिशय आवश्यक आहे. याच हेतूने आणि अशा कैद्यांमध्ये ही जागृती व्हावी, शिक्षा भोगून करागृहाबाहेर आल्यानंतर त्यांची पावले पुन्हा या दलदलीकडे वळू नयेत इतकंच नाही तर त्यांचं पुनर्वसन व्हावं या हेतूने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते' असंही त्यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश (पुणे) संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन झाले. या प्रसंगी अमली पदार्थ विरोधी कक्ष, सीमाशुल्क आयुक्तालय, पुणेचे मा. मदन देशमुख आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणेच्या सचिव मा. एम. डी. कश्यप उपस्थित होत्या. याचे आयोजन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त ऍडव्होकेट नंदिनी शहासने यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97799 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune