अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

देशी वृक्षांचे वाटप

पुणे ः गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे, ही काळाची गरज आहे. माय अर्थ फाउंडेशन, लायन्स क्लब, शिवोदय मित्र मंडळ आणि प्रा. अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्था, वाई यांच्यातर्फे वसुंधरा गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. नवी पेठेतील, गांजवे चौकाजवळील शिवोदय गणेश मंडळातर्फे हजार देशी वृक्षांचे आणि बियांचे वाटप करण्यात येत आहे. शिवोदय मंडळाने वसुंधरा मातेच्या मूर्तीच्या माध्यमातून तिचे माहात्म्य सांगणारा प्रबोधनात्मक देखावा साकार केला आहे. देखावा पाहायला येणाऱ्‍या नागरिकांना कोणतेही एक देशी झाड मोफत दिले जात आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणप्रेमी आणि गणेशमंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी आयोजक लायन्स क्लबचे राज मुछाल, तुळशीबाग मंडळाचे राजेश दातार, माय अर्थचे ललित राठी, मंडळाचे दिनेश भिलारे, हितेंद्र सोमाणी, अँड. नरेंद्र निकम उपस्थित होते.

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने विधायक कार्यक्रम
पुणे : पूरग्रस्तांना मदत, वंचितांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक आधार, शेतकऱ्यांपासून सर्व घटकांना मदत करणारे नवी पेठ गांजवे चौकातील उत्सव मित्र मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. नवी पेठेतील खिलारे वाड्यात मंडळाची सुरुवात १९७२ मध्ये झाली. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने मंडळाने आळंदी येथील स्नेहवन सामाजिक संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सन्मानित करून आर्थिक साह्य करण्याचे ठरवले आहे, असे अध्यक्ष अतुल धर्मे यांनी सांगितले. कार्याध्यक्ष सुधीर काळे, अजित काळे, विजय लोणकर, विनय कदम, सुनील वाबळे, सचिन गायकवाड, धनंजय लोणकर, सुनील पाटील आदी कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव सुरळीतपणे चालू ठेवला आहे.

‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर व्याख्यान
पुणे ः ‘‘शिक्षण हे माणूस व देशाच्या विकासासाठी मूलभूत गरज आहे. जनतेच्या प्रक्रियांची फारशी दखल न घेता व संसदेत चर्चा न करताच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० मंजूर केले. हे नवे धोरण म्हणजे शिक्षणाचे धार्मिकीकरण, बाजारीकरणाची नीती आहे, ’’असे लोकायात संघटनेच्या प्रमुख अलका जोशी यांनी व्यक्त केले. दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेच्या ३८६ व्या पुष्पाचे व्याख्यान मालिकेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे होते. यावेळी शिवाजी अडाळगे, उर्मिला पवार, लक्ष्मण रिठे, रामराव कांबळे, लोकायतचे तुषार, साहेबराव खंडाळे, संजय केंदळे आणि संतोष माने आदी उपस्थित होते. सुजित रणदिवे यांनी प्रस्ताविक केले. लक्ष्मण लोंढे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97805 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..