जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या त्रुटीसंदर्भात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या 
त्रुटीसंदर्भात याचिका
जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या त्रुटीसंदर्भात याचिका

जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या त्रुटीसंदर्भात याचिका

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) घेतलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशा मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

‘आयआयटी, मुंबई’च्या वतीने २८ ऑगस्ट रोजी ही ऑनलाइन परीक्षा घेतली. या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक दोषांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. प्रश्न ‘झूम इन’ होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्या तक्रारींची परीक्षा नियंत्रण समितीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमार्फत जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती ॲड. श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.
परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांना प्रश्नांची उत्तरे नीट सोडविता आली नाहीत, त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आले नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. देशभरात ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांनी या याचिकेद्वारे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97815 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..