टेरिफ कार्डबाबत अनुकूलता रिक्षा पंचायतीची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेरिफ कार्डबाबत अनुकूलता
रिक्षा पंचायतीची माहिती
टेरिफ कार्डबाबत अनुकूलता रिक्षा पंचायतीची माहिती

टेरिफ कार्डबाबत अनुकूलता रिक्षा पंचायतीची माहिती

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात रिक्षा भाडे दर १ सप्टेंबरपासून बदले आहेत. मात्र, रिक्षा चालकाने रिक्षा मीटरचे प्रमाणिकरण केले असेल तरच त्याला नव्या दराने भाडे आकारता येणार आहे. त्यामुळे प्रमाणिकरणाला लागणारा वेळ लक्षात घेता रिक्षा भाडे दर पत्रक (टेरिफ कार्ड) वापरण्यास परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीने दिली.

भाडे दर लागू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रिक्षा मीटरच्या प्रमाणिकरणाची अट घातली होती. मात्र, ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने प्रमाणिकरण होईपर्यंत भाडे दर पत्रक वापरण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांबाबत परिवहन आयुक्त डॉ. ढाकणे यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली. त्यावेळी भाडेपत्रकावर बारकोड वापरल्यास ही अडचण येणार नाही, हे डॉ. ढाकणे यांनी लक्षात आणून दिले. भाडे दर पत्रकाला अनुकूलता दर्शविली तसेच रिक्षा भाडेदर पत्रक रिक्षा चालकाने जवळ बाळगलेले असेल तर त्याला आपली रिक्षा प्रवासी सेवेत आणता येईल, यावर चर्चा झाली. असे रिक्षा पंचायतने सांगितले. या बैठकीला सहपरिवहनआयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, आनंद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.

या मुद्यावर चर्चा

लॉक डाऊन काळामध्ये (१ फेब्रुवारी २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२१) या कालावधीमध्ये परवाना नूतनीकरणासाठी आकारण्यात आलेला दंड परत केला जाईल, असे बैठकीत मान्य केले आहे. तसेच विडो हस्तांतरित करण्यासाठी विम्याची अट सुद्धा रद्द करणे, नवीन परमीट परवाना हस्तांतर, लॉकडाऊन काळातील दंड आदी मुद्यावर चर्चा झाली, असे सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदिप भालेराव आणि रिक्षा फेडरेशनचे आनंद तांबे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97826 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..