मिळकतकर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती सवलतीच्या निर्णयावर मुंबईतील बैठकीत निघेल तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
सवलतीच्या निर्णयावर मुंबईतील बैठकीत निघेल तोडगा
मिळकतकर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती सवलतीच्या निर्णयावर मुंबईतील बैठकीत निघेल तोडगा

मिळकतकर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती सवलतीच्या निर्णयावर मुंबईतील बैठकीत निघेल तोडगा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : मिळकतकराच्या ४० टक्क्यांच्या सवलतीचा आणि तीन वर्षांच्या फरकासह रक्कम वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता यावर अंतिम तोडगा १४ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत काढला जाणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी वार्ताहरांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर या प्रसंगी उपस्थित होते.

पहिल्या टप्‍प्यात ९७ हजार नागरिकांना याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६० हजार मिळकतधारकांना थकबाकी भरण्याचे मेसेज नुकतेच पाठविण्यात आले. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. ‘सकाळ’ने आक्रमकपणे पुणेकरांच्या भावनेला वाचा फोडून ही थकबाकी माफ करा अशी भूमिका घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची थकबाकी पुढील आदेश येईपर्यंत भरू नये असे परिपत्रक काढले. तसेच पाटील यांनी महापालिकेत बैठक घेऊन या विषयावर आयुक्तांशी चर्चा केली.

भांडवली करपद्धतीचा अभ्यास करणार
महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर कर आकारणीसाठी अभ्यास सुरू केला आहे. त्यासाठी एका क्षेत्रीय कार्यालयातील सर्व प्रकारच्या मिळकतींचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यास केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

कशी होणार स्थगितीच्या निर्णयाची अंमलबजावणी
ग्रामीण भागात गुंठेवारीतील घरांचा शेतसाराही वसूल केला जातो. तसेच त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्याने त्याचाही कर वसूल केला जातो. एकाच जागेसाठी दोन कर आकारले जात असताना संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेतसाऱ्यास स्थगिती देणारा आदेश दरवर्षी काढतात. त्याच पद्धतीने ४० टक्के मिळकतकराच्या फरकाच्या रकमेची वसुली करण्यासाठी दरवर्षी परिपत्रक काढून स्थगिती द्यावी लागेल.

थकबाकी भरलेल्यांचा विचार आवश्‍यक
९७ हजार पैकी सुमारे ३० हजार मिळकतधारकांनी २०१९ ते २०२२ या तीन वर्षांच्या फरकाची रक्कम भरली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी पैसे भरले आहेत. ही रक्कम पुढील बिलात वळती केली जाणार की कसे याबाबतही मुंबईतील बैठकीत स्पष्टता येणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यासाठी नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97842 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..