अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्काराचे वितरण
पुणे, ता. ६ ः विश्वकर्मा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. सामाजिक क्षेत्रासाठी अंकल सोनवणे, क्रीडा क्षेत्रासाठी गणेश दांगट, पत्रकारिता क्षेत्रासाठी विठ्ठल तांबे आणि अभिनय क्षेत्रासाठी श्रेया पासलकर यांना राज्य मागास आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रमोद सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्करराव कदम, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे, निवृत्त तहसीलदार रमेश राजगुरू आदी उपस्थित होते. ‘‘निळू फुले यांचा समतेचा विचार पुरस्काराच्या माध्यमातून विश्वकर्मा प्रतिष्ठान पुढे नेत आहे, हे कौतुकास्पद आहे’’, असे पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू गरुड यांनी केले. तर आकाश लोणारे यांनी आभार मानले. संयोजन अनिल सोमवंशी, नीलेश गुंजाळ, मानव देवकाते यांनी केले.

‘जीएसटी अमृतधारा ७५ कूट प्रश्न’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. ६ ः महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे अॅड. गोविंद पटवर्धन लिखित ‘जीएसटी अमृतधारा ७५ कूट प्रश्न’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या उद्योग आघाडीच्या अध्यक्षा अमृता देवगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रकाशन समितीचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. महेश भागवत, असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, प्रकाशन समितीचे समन्वयक प्रसाद देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी देवगावकर म्हणाल्या, ‘‘लघु मध्यम उद्योजकांना जीएसटी बाबत अनेक प्रश्न पडले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.’’ तर, या पुस्तकातून ७५ कूट प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. आता पुढचे ७५ प्रश्न व उत्तरांवर पुस्तक लिहिण्याची तयारी सुरु केली आहे’, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

‘सरपंच’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. ६ ः गणेश सानप व संतोष बिनवडे लिखित ‘सरपंच’ या पुस्तकाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ‘सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक यांनी एकत्र येऊन आपापल्या गावाचा विकास कसा साधता येईल, यासाठी प्रयत्नशील राहावे. हाच पुस्तकामागचा हेतू आहे’, असे लेखक सानप व बिनवडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशक शारदा राख, सचिन म्हसे आणि शरद राजभोज यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97848 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..