‘ट्रस्टचा कारभार हवा असल्याने माझी बदनामी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ट्रस्टचा कारभार हवा असल्याने माझी बदनामी’
‘ट्रस्टचा कारभार हवा असल्याने माझी बदनामी’

‘ट्रस्टचा कारभार हवा असल्याने माझी बदनामी’

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : पुणे बढार्इ समाज ट्रस्टची भवानी पेठेत असलेली जागा आणि ट्रस्टचा कारभार हाती पाहिजे असल्याने काही लोकांकडून माझी बदनामी करण्यात असल्याचा आरोप शैलेश बढार्इ यांनी केला. तसेच ट्रस्टचा मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष आहे. समाजानेच मला निवडून दिले आहे. त्याची सरकारी दप्तरी नोंद आहे, असा दावादेखील बढार्इ यांनी केला आहे. विसर्जन मिरवणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून घेतलेला आक्षेप हा ‘पुणे बढाई समाज ट्रस्ट’चा नसून वैयक्तिक शैलेश बढाई यांचा आहे. ते ट्रस्टचे अध्यक्ष नाहीत, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती समाजातील व्यक्तींना फूस लावून त्यांचे मत परिवर्तन करण्याचे काम करीत आहेत. त्यांचा परिवार मोठा असल्याने ते दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बढार्इ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97851 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..