भांडवली पद्धतीवर कर आकरणीवरून ‘आप’चे प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडवली पद्धतीवर कर 
आकरणीवरून ‘आप’चे प्रश्‍न
भांडवली पद्धतीवर कर आकरणीवरून ‘आप’चे प्रश्‍न

भांडवली पद्धतीवर कर आकरणीवरून ‘आप’चे प्रश्‍न

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘जास्त सुविधा, जास्त कर’ या भांडवली मूल्यावर आधारीत कर प्रणाली महापालिका आणून पाहत आहे. यामध्ये ‘सुविधा’ या शब्दाचा नेमका महापालिकेने स्पष्ट केला पाहिजे. महापालिका पुरवत असलेल्या की नागरीकांनी स्वत:च्या खर्चातून निर्माण केलेल्या सुविधा हे स्पष्ट झाल्यानंतरच कर आकरणीची ही पद्धत अवलंबिण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
महापालिकेमध्ये मिळकत कर आकारणीची पद्धत बदलून ती भांडवली मूल्यावर आकारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्या सोसायट्यांमध्ये जास्त सुविधा आहेत, त्यांना जास्त कर व जिथे कमी सुविधा आहे, तिथे कमी कर अशी पद्धत असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर याचा अभ्यास करून एका क्षेत्रीय कार्यालयातील आस्थापनांना असा कर लावला जाणार आहे. परंतु, ही पद्धत लागू करण्यापूर्वी ‘सुविधा’ या शब्दाचा विचार करताना ‘महापालिका पुरवत असलेल्या सुविधा’ असा घ्यायला हवा. त्या जर दिल्या जात असतील तरच कर आकारणी केली जावी, असा त्याचा अर्थ असायला हवा. ज्या सुविधा महापालिका देतच नाही, त्यासाठी कर लावणे योग्य नाही. अशी पक्षाची भूमिका आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97867 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..