‘मुद्रांक शुल्क’कडून १४ हजार कोटींचा महसूल जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मुद्रांक शुल्क’कडून १४ हजार कोटींचा महसूल जमा
‘मुद्रांक शुल्क’कडून १४ हजार कोटींचा महसूल जमा

‘मुद्रांक शुल्क’कडून १४ हजार कोटींचा महसूल जमा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला मागील पाच महिन्यांत दस्तनोंदणीतून १४ हजार ८९४ कोटींचा महसूल मिळाला आहे. राज्य सरकारने विभागाला दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४७ टक्के महसूल पाच महिन्यांत जमा करण्यात या विभागाला यश आले आहे. यावरून बांधकाम क्षेत्रातही सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येते.

राज्याला महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते. चालू वर्षी राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचा महसुलाचे उद्दिष्ट विभागाला दिले आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यात १० लाख ७९ हजार दस्तांची नोंदणी झाली आहे.

दस्तसंख्या आणि जमा झालेला महसूल (कोटींत)
महिना दस्तसंख्या महसूल
एप्रिल २,११,९१२ १८०२
मे २,२२,५७६ २८०७
जून २,४१,२८६ ३४२३
जुलै २,०५,७०९ ३५६६
ऑगस्ट १,९७,५७७ ३२९३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97881 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..