चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम नोएडा येथील कंपनीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम नोएडा येथील कंपनीला
चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम नोएडा येथील कंपनीला

चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम नोएडा येथील कंपनीला

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अडथळा ठरणारा जुना पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. त्याबाबतचा अहवाल ही कंपनी गुरुवारपर्यंत (ता. ८) सादर करणार आहे.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हे पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीला दिले जाणार आहे. हा पूल स्फोटकांच्या साहाय्याने पाडता येईल किंवा कसे? याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
दरम्यान, १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातील जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील उन्नत मार्गावरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठीचे काम सुरु झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97883 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..