रुफ टॉप हॉटेलवर कारवाई न केल्यास निलंबन पुणे महापालिका आयुक्तांचा पेठ निरीक्षकांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुफ टॉप हॉटेलवर कारवाई न केल्यास निलंबन
पुणे महापालिका आयुक्तांचा पेठ निरीक्षकांना इशारा
रुफ टॉप हॉटेलवर कारवाई न केल्यास निलंबन पुणे महापालिका आयुक्तांचा पेठ निरीक्षकांना इशारा

रुफ टॉप हॉटेलवर कारवाई न केल्यास निलंबन पुणे महापालिका आयुक्तांचा पेठ निरीक्षकांना इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : इमारतींच्या गच्चीवर अनधिकृतपणे चालणाऱ्या हॉटेलला तीन पट मिळकतकर लावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. पण त्यावर अद्याप कारवाई केली नाही. त्यावर आयुक्तांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. पुढच्या आठवड्यात मी या कारवाईचा आढावा घेणार आहे. ज्यांनी कारवाई केली नाही, त्यांना निलंबित केले जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.

बाणेर येथील एका इमारतीवरील रुफ टॉप हॉटेलला मोठी आग लागली होती, यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. पण त्यामुळे या हॉटेलमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून मिळकतकर विभागाच्या पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील रुफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करावी, त्यांना तीनपट कर लावून तो वसूल करावा, असे आदेश दिले होते. शहरात अशी शेकडो हॉटेल असतानादेखील महापालिकेने आतापर्यंत केवळ चार ते पाच हॉटेलला तीनपट कर लावला आहे.

‘माननीयां’च्या हॉटेलमुळे मुद्दाम दुर्लक्ष
पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील मिळकतीच्या वापरात झालेला बदल, अनधिकृतपणे टाकलेले शेड, हॉटेल याची इत्थंभूत माहिती असते. पण या पेठ निरीक्षकांकडून रुफ टॉप हॉटेलला अद्याप नोटीस बजावण्यात आलेली नाही. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेठ निरीक्षकांकडे चौकशी केल्यानंतर ‘बघून सांगतो, लगेच कारवाई करतो,’ असे सांगून वेळ मारून नेली जात आहेत. दरम्यान शहरातील बहुतांश रुफ टॉप हॉटेल माजी नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक, राजकीय पदाधिकारी यांचे असल्याने कारवाई होत नसल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करून त्यांना तीन पट कर लावण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मी पुढच्या आठवड्यात याचा आढावा घेणार आहे. जर मिळकतकर विभागाचे कर्मचारी कारवाई करणार नसतील तर त्यांनाच निलंबित केले जाईल.
- विक्रमकुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97892 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..