विसर्जनानंतर शहर लगेच होणार चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनानंतर शहर लगेच होणार चकाचक
विसर्जनानंतर शहर लगेच होणार चकाचक

विसर्जनानंतर शहर लगेच होणार चकाचक

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना आता गणपतीला निरोप देण्याचे वेध लागले आहे. मंडळांकडून विसर्जन मिरवणूक रथ तयारीला वेग आला आहे. पण याच वेळी शहर स्वच्छ राहिले पाहिजे, कचरा लगेच उचलला जावा यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून विसर्जन मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासात शहर चकाचक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. त्याच प्रमाणे विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष अतिशय साधेपणाने व मिरवणुकांशिवाय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपतीचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शहरात खाद्यपदार्थ विक्री, खेळण्यांसह इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लागलेले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत तर याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पेठांमधील सर्वच रस्त्यांवर कचरा पडलेला असोत. विसर्जन मिरवणुकीला लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकापासून ते टिळक चौकापर्यंत दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते. त्यात ढकला ढकली होते. या गोंधळात अनेकांच्या चपला, बूट तुटतात, त्याचाही कचरा दरवर्षी निघत असतो. तसेच मिरवणुकीत उधळलेला गुलाल, फुले, रांगोळी असा कचरा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेला सर्व रस्ते झाडून घ्यावे लागतात.
पुणे महापालिकेने मध्यवर्ती भागासाठी १३०० कर्मचारी, आदर पूलानावाला फाउंडेशन, जनवाणी यासह इतर संस्था स्वच्छतेच्या कामामध्ये असणार आहेत. तर याच भागात २१० फिरते स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. तर शहराच्या इतर भागात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नियोजन केले आहे. त्यामध्ये ७ हजार ७०० कर्मचारी असणार आहेत. ज्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक जशी जशी पुढे जाईल तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. मध्यवर्ती भागात १३०० कर्मचारी स्वच्छता करणार आहेत. आदर पूनावाला फाउंडेशनतर्फे कचरा उचलण्यासाठी मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे काम गतीने होईल. भाविकांच्या सोईसाठी शहरात २१० फिरते स्वच्छतागृह असणार आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मनुष्यबळ उपलब्ध आहे.
- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

अग्निशामक दलाचे २०० कर्मचारी
विसर्जन करताना नदीपात्र शेजारील घाटावर दुर्घटना घडू नये यासाठी १५० जीवरक्षक, १५ अधिकारी, २० जवान यासह २०० कर्मचारी १५ घाटांवर नियुक्त आहेत. मुसळधार पाऊस पडून नदीला पूर आल्यास व दुर्घटना घडल्यास लगेच मदत कार्य करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक घाटावर सुरक्षेसाठी दोरी बांधील आहे, तसेच नदीमध्ये डेक्कन व पेठांच्या परिसरात तीन चार ठिकाणी दोर बांधली आहे. होडी, ट्यूबही ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97946 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..