महारुद्र पथकाचा गरजू विद्यार्थ्यांना आधार शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्यांची उचलली जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महारुद्र पथकाचा गरजू विद्यार्थ्यांना आधार
शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्यांची उचलली जबाबदारी
महारुद्र पथकाचा गरजू विद्यार्थ्यांना आधार शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्यांची उचलली जबाबदारी

महारुद्र पथकाचा गरजू विद्यार्थ्यांना आधार शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्यांची उचलली जबाबदारी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची परंपरा जपली जाते. गणेशाची पूजा करताना भक्तिभाव जपला जातो. तसा माणुसकीचाही धर्मदेखील राखायला हवा. या विचारातून सामाजिक कार्याचा वसा घेत हडपसरमधील महारुद्र ढोल ताशा पथकाने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार दिला आहे.

हडपसर भागात अनेक गरजू विद्यार्थी आहेत. त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सामाजिक सहकार्य शैक्षणिक, सामाजिक संस्थेकडून दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते. याचा आदर्श घेत संस्थेतील पाच विद्यार्थ्यांना ढोल पथकाने दत्तक घेतले आहे. पथकाने केलेल्या आर्थिक मदतीतून त्यांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्च केला जाणार आहे. तसेच दरवर्षी विधायक कामे केली जाणार आहेत. गणेशोत्सवामध्ये ढोल पथकात सहभागी होण्याची चांगली क्रेझ तरुणांमध्ये आहे. त्यामुळे वादनाची आवड असलेल्या तरुणांना ढोल पथकात सहभाग घेता यावा, असा विचार करत हडपसरमधील तरुणांनी एकत्र येत महारुद्र ढोल पथकाची २०११ मध्ये स्थापना केली. यामुळे तरुणांना ढोल पथकात सहभागी होण्यासाठी शहराच्या मुख्य भागात जावे लागत नाही. तसेच मुलींनादेखील त्यांची हौस पूर्ण करता येते, असे पथकाने सांगितले.

कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अनेक गणेश मंडळेदेखील मोठ्या थाटात उत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे सोसायट्या आणि गणपती मंडळांची ढोल पथकाला अधिक मागणी आहे. मिरवणुकीमध्ये तासाला २१ हजार रुपयांचे मानधन असते. त्यामध्ये मंडळानुसार बदल होत असतो. या पैशांतून ढोल पथकाचा सर्व खर्च भागविला जातो. उरलेल्या पैशांतून सामाजिक उपक्रम राबविले जातात.
- संजय वाळके/ज्ञानेश्वर वरगडे, पथकप्रमुख

पथकाची २०११ साली स्थापना झाली असून, यामध्ये सध्या १५० वादक आहेत. यापैकी ५० मुली आहेत. पथकाने कोरोनाकाळात नागरिकांना मोठी मदत केली. पथकाच्या माध्यमातून केवळ वादनच नव्हे तर संस्कृतीचे, विचारांचे, सामाजिक कार्यांचे संस्कार केले जातात. पथकाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांना भेटी दिल्या जातात. यातून नेतृत्व कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. गडावर स्वच्छता मोहीम राबविली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी वृक्षारोपणही केले जाते.
- विराज तुपे, संस्थापक, महारुद्र ढोल ताशा पथक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97972 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..