शिक्षणाइतकेच खेळाला महत्त्व लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाइतकेच खेळाला महत्त्व

लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र
शिक्षणाइतकेच खेळाला महत्त्व लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

शिक्षणाइतकेच खेळाला महत्त्व लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः ‘‘चांगले खेळ खेळणारे विद्यार्थी उत्तम अभ्यास करतात, हे आता वैज्ञानिक सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात आता शिक्षणाइतकेच खेळाला महत्त्व दिले आहे,’’ असे मत माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

आझम कॅम्पस येथे आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने आयोजित या चर्चासत्राला, एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, महामंडळाचे सरकार्यवाह ॲड. विजय गव्हाणे, कार्यवाह नेमिनाथ बिरनाळे आदी उपस्थित होते. महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हर्च्युअल परिसंवादाला शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उपस्थित प्राध्यापकांच्या प्रश्नांना देशमुख यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘नवीन धोरण हे सर्वंकष असून, त्याची अंमलबजावणी हा आव्हानात्मक भाग असणार आहे. पुढील वर्षापासून महाराष्ट्र सरकार हे धोरण अवलंबेल असे वाटते. दिवाळीनंतर या प्रक्रियेला वेग येईल.’’ शैक्षणिक धोरण यशस्वी करायचे असेल तर तंत्रज्ञानाधारीत शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज इनामदार यांनी व्यक्त केली.

देशमुख म्हणाले....
- पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रथमच नियमावली
- तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी बाल शिक्षण हा स्वतंत्र विषय
- माध्यमिक शाळांनी आता व्होकेशनल ट्रेनिंग हाती घ्यावे
- रस्ते, वीज आणि पाण्यावरून राजकारण शिक्षण-आरोग्याच्या मुद्द्यावर केंद्रित होणे सकारात्मक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98020 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..