गतिमान रेल्वे प्रवासाला सुरक्षिततेचे ‘कवच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गतिमान रेल्वे प्रवासाला सुरक्षिततेचे ‘कवच’
गतिमान रेल्वे प्रवासाला सुरक्षिततेचे ‘कवच’

गतिमान रेल्वे प्रवासाला सुरक्षिततेचे ‘कवच’

sakal_logo
By

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे ः रेल्वे प्रवास गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी दौंड ते लोणावळा दरम्यान कवच म्हणजेच टीकास (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम ) ही यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी पुणेसह दौंड, लोणावळा स्थानकाजवळ सात कम्युनिकेशन टॉवर उभारले जाणार आहे. यामुळे एखाद्या रेल्वे चालकाने लाल सिग्नल क्रॉस केला तर रेल्वे आपोआपच जागच्या जागी थांबणार आहे. शिवाय, कॅबमध्येच पुढचा सिग्नल दिसणार असल्याने रेल्वेची गती कमी करायची की नाही हे चालकाला आधीच ठरवता येणार आहे.

महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर गाड्यांची गती वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. हे करीत असतानाच रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या करिता अपघात रोखणारी ‘कवच’ ही यंत्रणा बसवली जात आहे. मुंबई- चेन्नई रेल्वे मार्गावर ही यंत्रणा बसवली जाणार आहे. पुणे रेल्वे विभागाच्या गती शक्ती युनिटच्या वतीने हे काम केले जाणार आहे. यासाठी ७ ठिकाणी कम्युनिकेशन टॉवर उभारले जाणार आहे. याच्या माध्यमातूनच चालकाला सिग्नल विषयी अद्ययावत माहिती मिळणार आहे.

‘कवच’ म्हणजे काय ?

रेल्वे इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसवली जात आहे. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडलेले असतात. यासाठी पुणे स्थानकावर कम्युनिकेशन टॉवर उभारले जाईल. यांच्यामार्फतच इंजिन व सिग्नलवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. चालकाच्या नजरचुकीने जर रेल्वेने लाल सिग्नल क्रॉस केला तर चालकाच्या मदतीशिवाय तर रेल्वे जागच्या जागी थांबेल.

‘कवच’चे फायदे:

१. रेल्वेचा समोरासमोर होणार अपघात टळेल. दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जरी एकाच ट्रॅकवर धावत असतील तरीही या प्रणालीमुळे त्या दोन्ही रेल्वे एकमेका पासून ३ किमी अंतरावर थांबतील.
२. सहाय्यक रेल्वे चालकाला सारखे स्पॉट सिग्नल बघण्याची गरज नाही. कॅबमधील डिस्प्लेवर पुढचा सिग्नल दिसणार आहे. यामुळे रेल्वेची गती गती वाढवायची की कमी करायची हे त्याला आधी ठरविता येईल. यामुळे गतीमध्ये सातत्य राखणे सोपे होणार आहे.

पुणे रेल्वे विभागात कवच ही प्रणाली बसवली जाणार आहे. गती शक्ती युनिटच्या माध्यमातून हे काम केले जाईल. लवकरच याच्या कामाला सुरवात होईल.
-बी के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

देशातील प्रमुख रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी कवच ही प्रणाली बसवली जात आहे. यासाठी निवडक रेल्वे स्थानकांवर कम्युनिकेशन टॉवर उभारले जातील. त्या माध्यमातून रेल्वेच्या गतीवर देखील नियंत्रण ठेवता येणार आहे.
-उमेश बोलांडे, कार्यकारी संचालक, टेलिकॉम विभाग, रेल्वे बोर्ड,नवी दिल्ली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98061 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..