विसर्जन मिरणूकीला साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मिरणूकीला साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त
विसर्जन मिरणूकीला साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त

विसर्जन मिरणूकीला साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : नागरिकांनी जेवढ्या थाटामाटात गणपतीचे स्वागत केले. आता तेवढ्याच उत्साहात गणेशाला निरोप दिला जाणार असल्याने पोलिसांची तगडी फौज बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. यामध्ये अतिवरिष्ठ, वरिष्ठांसह अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलासह सुमारे साडेआठ हजार पोलिस कर्मचारी तैनात असतील. तसेच प्रमुख विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा राहणार असून, सीसीटीव्हींचीदेखील नजर असेल.

यावर्षी गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध नसल्याने गणपतीचे दर्शन घेत देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यासोबतच नागरिकांना विसर्जन मिरवणुकीचेही आकर्षण आहे. त्यामुळे यंदा मिरवणुकीला मोठा जनसागर लोटण्याची असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली आहे.

गणेशोत्सवाला शुक्रवारी (ता. ९) सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गासह इतर प्रमुख रस्त्यांवरून शेकडो मंडळांची मिरवणूक होत असल्याने मध्यवर्ती भागातील काही रस्तेदेखील बंद असणार आहेत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी महाराज रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या रस्त्यांवर प्रामुख्याने तगडा बंदोबस्त असणार आहे. गुरुवारी (ता. ८) दुपारपासून ते शनिवार (ता. १०)पर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.

असा असणार बंदोबस्त
पोलिस उपायुक्त १०
सहायक पोलिस आयुक्त २३
पोलिस निरीक्षक १३८
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६२५
पोलिस कर्मचारी ७,७४२
एकूण ८,५३८

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98201 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..