सर्वांगसुंदर, मनमोहक रूपांचा संग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांगसुंदर, मनमोहक रूपांचा संग्रह
सर्वांगसुंदर, मनमोहक रूपांचा संग्रह

सर्वांगसुंदर, मनमोहक रूपांचा संग्रह

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : तांबे, पाषाण, लोखंड, संगमरवर, लाकडावर कोरलेल्या आकर्षक गणेशमूर्ती...तांदूळ, सुपारी, गारगोटी, शंख तसेच हत्तीच्या दातावर कोरीव काम केलेली लाडक्या बाप्पाची मनमोहक रूपे पाहायची असतील तर तुम्हाला थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणेश प्रतिकृती वस्तुसंग्रहालयाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. येथे अर्ध्या इंचापासून सात ते आठ फुटांपर्यंतच्या चित्तवेधक गणरायाच्या सर्वांगसुंदर मूर्तींचे दर्शन होईल. येथे देशभरासह थायलंड, बँकॉक येथून संकलित केलेल्या गणेशाची तब्बल ३००० रूपे पाहायला मिळतात.
पुणे जिल्हा न्यायालयात वकिली करत असलेले साठ वर्षीय ॲड. मुकुंद आगलावे यांनी वैद्यिक, पौराणिक तसेच आधुनिक गणेश मूर्तींचा संग्रह केला आहे. चिंतामणीवरील अतीव भक्तीपोटी त्यांनी लहानपणापासूनच गणरायाची विविध रूप संकलित करण्याचा छंद जोपासला. त्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची पदरमोड करून चार मजली संग्रहालय उभारले आहे. आगलावे यांनी गणेशाची विविध रूपे चित्रकारांकडून नैसर्गिक रंगात चित्तारून घेतली आहेत. त्याचे ४१ चित्रांचे खास दालन तयार केले आहे.

बँकॉकशी मैत्रीपर्व सुरू
बँकॉक येथील गणेश मूर्ती संग्रहालयाशी गणेशाच्या विलोभनीय मूर्तींची देवाण-घेवाण करण्यासाठी श्री चिंतामणी गणेश प्रतिकृती वस्तुसंग्रहालयाने मैत्रीपर्व सुरू केले आहे. याद्वारे बँकॉकमधील संग्राहालयाने आतापर्यंत सोळा मूर्त्या भेट दिल्या आहेत व संग्रहालयातून ४ गणेश रूपे पाठविल्या आहेत, असे आगलावे यांनी सांगितले.

अष्टविनायक मंदिरांच्या प्रतिकृती
मूर्तींच्या संग्रहासह अष्टविनायक गणपतींच्या मंदिरांसह कसबा गणपती, सारसबागेतील सिद्धिविनायक, वाई येथील ढोल्या गणपती, देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत.

येथून केले मूर्तींचे संकलन
१. थायलंड २. अफगाणिस्तान, ३. इंडोनेशिया, ४. नेपाळ, ५. बँकॉक, ६. हरिद्वार, ७. अलीगड, ८. मुंबई

गणरायाच्या कृपेने अन्‌ त्याच्या आराधनेसाठी चार मजली संग्रहालय उभारले आहे. चिंतामणीच्या कथेच्या ॲनिमेशन फिल्मचेही काम अंतिम टप्प्यात आहे. गणेश भक्तांनी आमच्याकडे ब्राँझ, पितळाच्या मूर्ती पाठविल्या तर संग्रहालयातर्फे त्यांचे जतन केले जाईल.
- ॲड. मुकुंद आगलावे, गणेशमूर्ती संग्राहक व श्री चिंतामणी मंदिर पुजारी, थेऊर

89842, 89844, 89849, 89855

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98301 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..