रेल्वेचा चेन पुलिंगप्रकरणी कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेचा चेन पुलिंगप्रकरणी कारवाईचा बडगा
रेल्वेचा चेन पुलिंगप्रकरणी कारवाईचा बडगा

रेल्वेचा चेन पुलिंगप्रकरणी कारवाईचा बडगा

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः रेल्वे डब्यांत आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबविण्यासाठी अलार्म चेन पुलिंगचा पर्याय दिला आहे. मात्र, काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी याचा वापर करीत आहे. परिणामी रेल्वे गाड्यांना उशीर होत आहे. चेनचा गैरवापर थांबविण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांवर कारवाई बडगा उगारला असून यात सुमारे ७७३ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये चेन ओढण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याचा फटका गाडीतील अन्य प्रवाशांना बसतो. शिवाय गाड्यांना उशीर झाल्याने रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडते. परिणामी, रेल्वेने अशा प्रवाशांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. आरपीएफ अशा प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करते. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होते. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ दरम्यान ९६० प्रवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील ७७३ प्रवाशांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98591 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..