बुऱ्हानी गार्डस्‌ची गणेशाच्या चरणी सेवा ‘हुब्बल वतन मिलन इमान’ या संदेशाची कृतीतून अनुभूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुऱ्हानी गार्डस्‌ची गणेशाच्या चरणी सेवा
‘हुब्बल वतन मिलन इमान’ या संदेशाची कृतीतून अनुभूती
बुऱ्हानी गार्डस्‌ची गणेशाच्या चरणी सेवा ‘हुब्बल वतन मिलन इमान’ या संदेशाची कृतीतून अनुभूती

बुऱ्हानी गार्डस्‌ची गणेशाच्या चरणी सेवा ‘हुब्बल वतन मिलन इमान’ या संदेशाची कृतीतून अनुभूती

sakal_logo
By

पुणे, ता. १० : रात्रीचे दोन वाजलेले..बेलबाग चौकात प्रचंड गर्दी उसळलेली...या गर्दीत एक गरोदर महिला अडकली...पतीचा हात सुटला..भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या महिलेकडे बुऱ्हानी गार्डसचे लक्ष गेले. ते‌ तिच्या मदतीला धावले. गर्दीतून बाहेर कढत डॉक्टरांकडे पोचविले. तिच्या पतीशी संपर्क करून तिला सुखरूप मार्गी लावले.
बेलबाग चौकातील गर्दीत दोन महिला गुदमरल्या...त्यातील एक बेशुद्ध पडली...पोलिसांकडून माहिती मिळताच तत्काळ बुऱ्हानी गार्डस्‌ तिच्या मदतीला धावले. गर्दी बाजूला सारत, ढोलपथकांना दूर करीत ॲम्बुलन्सला आणून त्यांना सुखरूप बाहेर काढले. गर्दीत चुकलेल्या चार ते पाच मुलांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोचविण्याचे काम या गार्डस्‌ने केले.

‘हुब्बल वतन मिनल इनाम’ म्हणजे देश आणि समाजासाठी जे काही सर्व उत्कृष्ट आहे, ते काम करा,’ हा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदाना मुफदल सैफुद्दीन साहेब यांनी दिलेला संदेश पुण्यातील दाऊदी बोहरा समाजाच्या बुऱ्हानी गार्डस्‌ने विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पुणेकरांना आपल्या कृतीतून दिला. या समाजाच्या तीसहून अधिक या गार्डस्‌ने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पहिल्यांदा श्री गणेशच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आणि मानवतेचा एक संदेश देऊ केला. एवढे नव्हे, तर दहा दिवसांच्या उत्सवात त्यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम काम केले. खरे तर हे सर्व गार्डस्‌ व्यवसायाने व्यापारी. कोरोनाकाळातील त्यांचे काम पाहून पोलिसांनी दाऊदी बोहरा समाजाला विनंती केली. त्यांनीही तत्काळ तिला मान देत श्री गणेशाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली.

बुऱ्हानी गार्डस्‌ नावाची आमची संस्था आहे. त्यामध्ये संपूर्ण शहरात सुमारे तीनशे गार्डस्‌ आहेत. डॉ. सय्यदाना यांच्या आदेशानुसार आम्ही समाजाची सेवा करण्याचे काम करतो. यंदा प्रथमच विसर्जन मिरवणुकीत सेवा करण्याची संधी मिळाली. कोणताही धर्म असो की जात मानवसेवा हीच खरी सेवा आहे. ज्या देशात आपण राहतो. त्या देशासाठी जे काही चांगले आहे, ते काम आण केले पाहिजे, हा आमच्या धर्मगुरूंनी दिलेला संदेश आहे. तो आम्ही पाळतो. शुक्रवारी (ता. ९) सकाळी सातपासून आम्ही लक्ष्मी रस्त्यावर होतो. शनिवारी (ता. १०) आठ वाजता आम्ही घरी गेलो. हा एक वेगळा अनुभव होता.
- अब्बासभाई पूनावाला व अब्बासभाई चोपडावाला, बुऱ्हानी गार्डस

९०४४०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98679 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..