वर्दीतील माणूसकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्दीतील माणूसकी
वर्दीतील माणूसकी

वर्दीतील माणूसकी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : जेमतेम पंचविशीतील ‘ती’ मुलगी. शेजारून चालणाऱ्या माणसाच्या पायात पाय अडकून मैत्रीण पडली. तिला उचलण्यासाठी ही मुलगी खाली वाकली. इतक्यात गर्दीचा रेटा वाढला आणि काही कळायच्या आत तिच्या पोटावर कोणाचा तरी पाय पडला. श्वास गुदमरला. ही घटना पाहताच तिथे बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांनी धाव घेतली. गर्दीतून त्या मुलाला बाहेर काढले. बेलबाग चौकातील पोलिस मदत केंद्रात तिला आणले.
डोळ्यातून घळाघळा वाहणारे पाणी, श्वास घ्यायला होणारा त्रास, एकाच वेळी प्रचंड भीती आणि पोटात होणाऱ्या वेदना मिरवणूक बघायला आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. पोलिस मदत केंद्रावर असलेल्या महिला पोलिस उपायुक्त शीतल घोडे यांना परिस्थितीचा अचूक अंदाज आला. त्यांनी मुलीला पाणी प्यायला दिले. कुठे लागले, काय झाले याची आपुलकीने चौकशी केली. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या गर्दीत तिला घोडे यांनी आपलेपणा दिला. त्यामुळे कावऱ्या-बावऱ्या झालेल्या त्या मुलाला धीर मिळाला.
या बद्दल ‘सकाळ’शी बोलताना घोडे म्हणाल्या, ‘‘गर्दीत पडलेल्या मुलीला तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली. तिला गर्दीतून सोडविले आणि पोलिस मदत केंद्रावर आणले. तिला धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करून, रुग्णवाहिकेतून गर्दीच्या बाहेर सोडण्यात आले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98771 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..