'मोठ्या मंडळापुढे पोलिस लोटांगण घालतात' असं म्हणत अखेर गणपती खांद्यावर नेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मोठ्या मंडळापुढे पोलिस लोटांगण घालतात' असं म्हणत अखेर गणपती खांद्यावर नेला
...अखेर गणपती खांद्यावर नेला

'मोठ्या मंडळापुढे पोलिस लोटांगण घालतात' असं म्हणत अखेर गणपती खांद्यावर नेला

पुणे : वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैतागलेल्या बुधवार पेठेतील बाल विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अखेर गणपतीची मूर्ती खांद्यावर घेत विसर्जन मार्गावरून गेले. ‘मोठ्या मंडळापुढे पोलिस लोटांगण घालतात,’ असा आरोप करीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला.

मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर शिवाजी महाराज रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरून बेलबाग चौकात येणारी प्रत्येकी पाच मंडळे पोलिसांकडून सोडली जातात. त्यानुसार मानाचा पाचवा गणपती बेलबाग चौकातून पुढे गेल्यानंतर सिटी पोस्टाकडून येणारी पाच मंडळे पोलिसांनी सोडली. त्यानंतर शिवाजी रस्त्यावरून बेलबाग चौकात येणाऱ्या पाच गणपती मंडळांना सोडण्याऐवजी सातहून अधिक मंडळे सोडली. त्यामुळे सिटी पोस्टाजवळ थांबलेल्या मंडळानी त्यावर आक्षेप घेतला. बाल विकास, हसबनीस बखळ, अनमोल आणि मंगल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेत सोडण्याची विनंती केली.

त्यामध्ये अनमोल आणि मंगल मित्र मंडळ यंदा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे लवकरच सोडण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र पोलिसांनी ‘माफ करा, आम्ही काय करू शकत नाही,’ असे सांगत हात जोडले. रात्री नऊपासून अडकलेल्या या मंडळांना पोलिसांनी न सोडल्यामुळे रात्री दीडच्या सुमारास बाल विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रथावरील गणपती खांद्यावर घेतला आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98788 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..