मतभेद विसरून राजकीय नेते एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतभेद विसरून राजकीय नेते एकत्र
मतभेद विसरून राजकीय नेते एकत्र

मतभेद विसरून राजकीय नेते एकत्र

sakal_logo
By

पुणे, ता. १० : राज्यात एकीकडे राजकीय संघर्ष सुरू असताना विसर्जन मिरवणुकीत मात्र विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी मतभेद विसरून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे दोघे पालखीचे भोई झालेच. तेथे या दोघांमध्ये संवाद झाला. कोरोनाच्या साथीनंतर दोन वर्षानंतर विसर्जन मिरवणूक होत असल्याने प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते. पाटील, ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, रोहित पवार आदी या वेळी उपस्थित होते.

सर्वपक्षीय नेते हे नेहमीच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये चांगल्या कामासाठी एकत्र येतात, हे चित्र नवे नाही. सामाजिक जीवनात सर्वांनी एकत्रच काम करायला हवे. राजकीय जीवनातसुद्धा कटुता निर्माण होऊ न देता एकमेकांशी राजकीय संघर्ष केला पाहिजे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

विसर्जनाला महापौर, पालकमंत्री नाहीत, त्यामुळे काही बिघडत नाही. पण हे कोणामुळे झाले, हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. हे सरकार पालकमंत्री नेमत नाही, तर करायचे काय? राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असून, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपल्याला मदत मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांना विश्वास वाटत नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोचविण्यात यायला हवी.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यात पालकमंत्री घोषित झालेले नाहीत, ते जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असतात. येथे विसर्जन मिरवणुकीसाठी आल्याने राजकारणावर काही बोलणार नाही. राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेले असून, ते राज्याच्या विकासासाठी नक्कीच चांगले नाही. आज राजकारणाचा खालच्या पातळीवर गेलेला स्तर वर आणण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98802 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..