‘सकारात्मक मानसिकतेतून ध्येय निश्चित करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकारात्मक मानसिकतेतून ध्येय निश्चित करा’
‘सकारात्मक मानसिकतेतून ध्येय निश्चित करा’

‘सकारात्मक मानसिकतेतून ध्येय निश्चित करा’

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘‘निसर्गाने माणसाला पंचेंद्रिय दिलेली आहेत. पण त्याहून आणखी एक महत्त्वाचे सहावे इंद्रिय आहे ते म्हणजे आपले मन. आपल्या मनाची ताकद जेव्हा ध्येयावर केंद्रित होते, त्यावेळी शरीर व बुद्धीचा विकास होतो. त्यातून व्यक्तिमत्त्व विकसित होते. जीवन जगताना सकारात्मक मानसिकतेतून ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे,’’ असे मत ‘इस्कॉन’ खराडी पुणेच्या भक्ती क्लबचे प्रमुख सनातन धर्म प्रभू यांनी केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ‘मनाची एकाग्रता व व्यक्तिमत्त्व विकास’ विषयावर सनातन धर्म प्रभू बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, इस्कॉन कोंढवा केंद्रातील विजय कृष्ण प्रभू, प्रा. सुभाष पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. सनातन धर्म प्रभू म्हणाले, ‘‘मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणा, मंत्रोच्चार आवश्यक आहे. आपली मानसिकता ही सकारात्मक असायला हवी. शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय करताना त्याला अध्यात्माची जोड दिल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.’’ यावेळी विजय कृष्ण प्रभू यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र खजुरे, सुनील पवार व प्रा. के. बी. पवार यांनी केले. तर डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.