‘कागद काच पत्रा कष्टकरीं’चा वर्धापन दिन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कागद काच पत्रा कष्टकरीं’चा वर्धापन दिन सोहळा
‘कागद काच पत्रा कष्टकरीं’चा वर्धापन दिन सोहळा

‘कागद काच पत्रा कष्टकरीं’चा वर्धापन दिन सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबा आढाव तसेच अनेक वर्षांपासून कचरावेचकांसोबत जवळून काम केलेल्या फ्रेनी तारापोर, मेधा कोतवाल, रोहिणी सहानी, हर्षिला मनसुखानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कचरावेचकांच्या ८० गटांना एकत्र आणले आहे. दरम्यान संस्थेचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेचार वाजता भवानी पेठेतील अरुण कुमार वैद्य स्टेडिअम येथे होईल.