मुंबा लघुपट महोत्सवाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबा लघुपट महोत्सवाचे उद्‍घाटन
मुंबा लघुपट महोत्सवाचे उद्‍घाटन

मुंबा लघुपट महोत्सवाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः चित्रपट मनोरंजन क्षेत्रामध्ये तरुणांना करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रामध्ये केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर करिअर म्हणून तरुणांनी यावे, असे आवाहन करतानाच चित्रपट क्षेत्रांमध्ये मुलींचे वाढते प्रमाण हे अभिमानाची गोष्ट आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी लेखक शरद तांदळे, अभिनेत्री निर्माती भाग्यश्री देसाई, अभिनेते नंदू माधव, लेखिका प्रियांका चौधरी, दत्ता गुंड, आयोजक जय भोसले, संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिषेक अवचार आदी उपस्थित होते. हा महोत्सव शुक्रवारपर्यंत (ता. ३०) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. तसेच शुक्रवारी महोत्सवात आलेल्या लघुपटांचा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावेळी तांदळे म्हणाले, ‘‘आजच्या काळात प्रेक्षकांना ओटीटीमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकृती घर बसल्या पाहता येत आहेत. त्यामुळे चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांना मोठे आवाहन निर्माण झाले आहे.’’ लघुपट माध्यम हे प्रभावी माध्यम असून मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रांती घडवेल, असे यावेळी देसाई यांनी सांगितले.