डॉ. स्वाती खारतोडे लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. स्वाती खारतोडे लेख
डॉ. स्वाती खारतोडे लेख

डॉ. स्वाती खारतोडे लेख

sakal_logo
By

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी...

उच्च रक्तदाबाचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी रक्तातील सोडियमचे, म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले वजन, पुरेशी झोप न होणे, शारीरिक आणि मानसिक त्रास, सतत चिडचिड, सिगारेट व दारूचे व्यसन ही नेहमी आढळून येणारी कारणे आहेत. यावर ‘फक्त घरी बनवलेले अन्न खाणे’ हा अतिशय उत्तम आणि सोपा उपाय आहे.
- डॉ. स्वाती खारतोडे, संशोधक आणि वैद्यकीय आहारतज्ज्ञ, पुणे
---
उच्च रक्तदाबाचे हृदय, किडनी, डोळे, मेंदू यांसारख्या मुख्य अवयवांवर दुष्परिणाम होऊन त्यांचे विकार होण्याची शक्यता वाढते.
काय पथ्ये पाळावीत?
यापैकी जास्त मीठ म्हणजेच सोडियमची मात्रा जास्त असलेले पदार्थ टाळणे आणि पोटॅशियमची मात्रा जास्त असलेले पदार्थ खाणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच, लघवीची मात्रा वाढवून शरीरातील सूज आणि सोडियमची मात्रा कमी करणारे पदार्थही ह्यामध्ये उपयुक्त ठरतात. आपल्यापैकी बरेचसे उच्च रक्तदाबाचे रुग्ण मीठ कमी खातात, परंतु ज्या पदार्थांमध्ये छुपे मीठ असलेले पदार्थ सेवन करतात. जसे, बेकारीचे पदार्थ, रेडी टू यूज पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ, चिप्स, चीज इत्यादी. हे पदार्थ टाळले पाहिजेत.
पोटॅशिअम जास्त असलेले पदार्थ, जसे केळी, बटाटा, रताळी, सुरण, शिंगाडा, अरबी, तसेच पावटा, चवळी, मटकी, राजमा, सोयाबीन, डाळींमध्ये मुगडाळ आणि उडीद डाळ, ओला नारळ आणि नारळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या, कोहळा, वांगी, सर्व प्रकारच्या शेंगभाज्या, फ्लॉवर, सुक्या मेव्यामध्ये खारीक, मनुके , अंजीर हे पदार्थ नियमित खावेत. तसेच, लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणारे पदार्थ, जसे नारळपाणी, लिंबूपाणी, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, पावटा, उसाचा रस हेही खावे. कलिंगड आणि बीटरूट ह्यामध्ये असलेल्या ‘नायट्रिक ऑक्साइड’मुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. हे कलिंगड आणि बीटरूट उच्च रक्तदाबाच्या रुग्णाना देऊन कितीतरी संशोधन झालेले आहेत, ज्यामध्ये ह्या पदार्थंच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणामध्ये आलेला आहे. तसेच, कच्च्या भाज्या सॅलडच्या स्वरूपामध्ये खाव्यात. कवठ, लसूण खाण्याचे चांगले परिणाम होतात. साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरावे.
उपयुक्त द्रवपदार्थ : नारळाचे पाणी, लिंबू पाणी, उसाचा रस, अननसचा ज्यूस, बीटरूटचा ज्यूस उच्च रक्तदाब कमी करतात.

काय टाळावे?
पदार्थ आळणी असेल तरी वरून मीठ घेऊ नये. खारवलेले शेंगदाणे, काजू, बदाम टाळावेत. रेडी टू यूज पदार्थ, जसे नूडल्स, पास्ता, मॅगी, पॉपकॉर्न, कॅन आणि टिनमधील पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ जसे चीज, बटर (ह्या ऐवजी घरी बनवलेले लोणी किंवा तूप खावे), प्रक्रिया केलेले मांस, जॅम, जेली, सॉससारखे पदार्थ, चिप्स, बाहेरचे तळलेले पदार्थ, पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट सारखे बेकारीचे पदार्थ पूर्णपणे टाळावेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिठाचे प्रमाण नैसर्गिकरीत्याच जास्त असल्यामुळे भाज्या शिजवताना त्यामध्ये मीठ टाकू नये, सैंधव मीठ वापरून केलेले घरी बनवलेले लोणचे, कुरडई चालेल. कॉफी शक्यतो टाळावी, कारण कॉफीने रक्तदाब वाढतो. मांसाहार पूर्णपणे टाळता आल्यास उत्तम, मात्र आवडत असल्यास महिन्यातून २ वेळा खावे आणि अंडी आठवड्यातून ३ वेळा खावीत. सुकी मासळी खाऊ नये.
आयुर्वेदामध्येही विड्याचे पान, गुलकंद, वेखंड चूर्ण, अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही किंवा वाढलेला उच्च रक्तदाब कमी होतो असे वर्णन आहे.

विहार : पथ्यकर आहारासोबतच पुरेशी झोप, आठवड्यातले पाच ते सहा दिवस प्रत्येकी ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करा. रोज ध्यान केल्यामुळे उच्च रक्तदाब कमी झाल्याचे मला माझ्या प्रॅक्टीसमध्ये आढळून आले आहे.