प्राध्यापक भरतीसाठी न्यायालयीन लढ्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापक भरतीसाठी न्यायालयीन लढ्याची तयारी
प्राध्यापक भरतीसाठी न्यायालयीन लढ्याची तयारी

प्राध्यापक भरतीसाठी न्यायालयीन लढ्याची तयारी

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः राज्यातील प्राथमिक शिक्षकांपासून महाविद्यालयांच्या प्राध्यापकांपर्यंत तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्राध्यापक भरतीचा प्रश्न चिघळत असून, संघटनांनी राज्य सरकार विरोधात थेट न्यायालयीन लढ्याची तयारी केली आहे.
प्राध्यापकांची सर्व रिक्त पदे भरावी आणि तासिका तत्त्वावरील मानधनाची पद्धत बंद करण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी केली आहे. नुकत्याच समितीच्या पार पडलेल्या बैठकीत काही ठराव करण्यात आले. शासन दरबारी केलेले आंदोलने, बैठका, भेटी आदी मार्गाने केलेला पाठपुरावा, त्यातून समोर येणारी प्रशासनाची निष्क्रियता लक्षात घेता आता रस्त्यावरची लढाई सुरू ठेवत न्यायालयीन लढाईचा मार्ग संघर्ष समिती अमलात आणणार असल्याचे राज्य समन्वयक प्रा. सुरेश देवढे-पाटील यांनी सांगितले. बैठकीतील ठरावांबाबत डॉ. प्रमोद तांबे म्हणाले, ‘‘प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सेट-नेट, पीएच.डी. पात्रता धारकांचे शोषण होत आहे. अपुऱ्या प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. वारेमाप आकारल्या जाणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला, तसेच ठरावही पारीत केला.’’