शनिवारपासून भरता येणार अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारपासून भरता येणार अर्ज
शनिवारपासून भरता येणार अर्ज

शनिवारपासून भरता येणार अर्ज

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शनिवारपासून (ता. १)नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सरल डेटाबेसवरून भरायची असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांच्या फक्त नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखांचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइनच भरावेत. नियमित शुल्काने अर्ज भरायच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी स्पष्ट केले.

तपशील आणि अर्ज करण्याचा कालावधी
- शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थी : १ ते २१ ऑक्टोबर
- व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषय, आयटीआयचे विद्यार्थी : २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर