आरोग्यदायी ह्रदय प्रत्येकासाठी पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यदायी ह्रदय प्रत्येकासाठी
पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्‍घाटन
आरोग्यदायी ह्रदय प्रत्येकासाठी पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्‍घाटन

आरोग्यदायी ह्रदय प्रत्येकासाठी पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे ः हृदयमित्र प्रतिष्ठानतर्फे जागतिक हृदय दिननिमित्ताने ह्रदयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘आरोग्यदायी हृदय प्रत्येकासाठी’ संकल्पनेवर पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी एकपात्री कलावंत संतोष चोरडिया उपस्थित होते. यावेळी निसर्गोपचारतज्ज्ञ श्रीकांत मुंदडा उपस्थित होते. स्पर्धात्मक जीवनशैली वाढते ताणतणाव, फास्ट फूड व व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण यामुळे तरुणांमध्ये ह्रदयरोग वाढत आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. सतीश भटकळ यांनी आभार मानले.

‘खिसे भरण्यासाठी कंत्राटी पद्धत जिवंत’
पुणे ः कंत्राटी कामगारांची उपासमार, कंत्राटी कामगारांचे बेहाल, कामगारांच्या पीएफवर दरोडा टाकून ठेकेदार मातब्बर झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांचे आपले खिसे भरण्यासाठी कंत्राटी पद्धत सुरु ठेवली आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने (आप) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी आप महिला संघटक सीमा गुट्टे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरद गायकवाड, अभिजित मोरे, नीलेश वांजळे आदी उपस्थित होते. गुट्टे म्हणाल्या, ‘‘सफाई कर्मचाऱ्यांना काम करताना अत्याधुनिक यंत्र सामग्री, अत्यावश्यक सेवा, उपकरणे व अवजारे ठेकेदारांमार्फत उपलब्ध करून देण्याची तरतूद हवी.’’ कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महापालिकेवर लवकरच आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

‘वंजारी समाजाचे प्रश्न सोडवा’
पुणे ः वंजारी समाजामध्ये एकजूट ठेवण्यासाठी राजकीय तसेच समाजातील व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा. दसरा मेळावा कोणीही घेतला तरी त्यामध्ये वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयाचे अधिवक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवशंकर आघाव यांनी पत्रकार परिषदेत केली.