महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान
महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, अपराजिता, अविवाहिता असे शब्द वापरून समाजातील काहीजण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेने या महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान हाती घेतले आहे, असे संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्वांना निवेदने देण्यात येणार आहेत. या स्त्रियांसाठी ‘अभया’ शब्दाचा वापर करण्याचा आग्रह केला जाणार आहे, असेही कुर्लेकर यांनी सांगितले. याप्रसंगी संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.
खूपदा महिलांना आपल्या भावना, मन व्यक्त करायचे असते. मात्र, कोणाशी बोलावे हे समजत नाही. यासाठी संस्थेतर्फे ‘अभया’शी संवाद साधायला ‘अभया-मनातली’ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना हा मुक्त संवाद साधायचा असेल त्यांनी ९३७०८२५३६८ या नंबरवर संपर्क साधावा. ही सुविधा पूर्णपणे मोफत आणि गोपनीय आहे, असे जोगळेकर यांनी सांगितले.