देसाई महाविद्यालयात संवाद कौशल्यावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई महाविद्यालयात संवाद कौशल्यावर कार्यशाळा
देसाई महाविद्यालयात संवाद कौशल्यावर कार्यशाळा

देसाई महाविद्यालयात संवाद कौशल्यावर कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः एच. व्ही. देसाई महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे नुकतेच ‘संवाद व जीवन कौशल्ये’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे तीन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात भाषण स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली.
‘विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर संवाद कौशल्य समृद्ध करणे गरजेचे आहे’, असे मत व्याख्याता डॉ. अश्विनी परुडे यांनी दुसऱ्या सत्रामध्ये केले. अखेरच्या सत्रात व्याख्याता डॉ. पद्मिनी माने यांनी मार्गदर्शन केले. उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. नीता बोकील आदी उपस्थित होते.