अल्पसंख्यांक आघाडीपदी आयुब शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्यांक आघाडीपदी आयुब शेख
अल्पसंख्यांक आघाडीपदी आयुब शेख

अल्पसंख्यांक आघाडीपदी आयुब शेख

sakal_logo
By

पुणे,ता. २९ : रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड.आयुब शेख यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही निवड केली. लोणावळा येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. तर ख्वाजाभाई शेख यांची सरचिटणीस पदी निवड झाली. आयुब शेख हे मुस्लिम कॉ.ऑपरेटिव्ह बँकेवर संचालक म्हणून पाचव्यांदा निवडून आले आहेत. आझम कॅम्पस संस्थेत त्यांनी २० वर्ष सचिव म्हणून काम पाहिले.