चोरी प्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी प्रकरणी एकास अटक
चोरी प्रकरणी एकास अटक

चोरी प्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : किराणा घेऊन घरी जात असलेल्या तरुणाला लुटल्याप्रकरणी एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक ऑॅक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अब्दुल महमूद शेख (वय २०, रा. गुजरवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर शोएब शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत महंमद नवीजान मन्सूरी (वय २६, रा. मांगडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुजरवाडीतील क्रिकेट मैदानासमोर १५ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली.