दर्जात्मक शिक्षणाला पसंती द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर्जात्मक शिक्षणाला पसंती द्या
दर्जात्मक शिक्षणाला पसंती द्या

दर्जात्मक शिक्षणाला पसंती द्या

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः अलीकडे मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल आहे. मात्र, केवळ माध्यम न पाहता दर्जात्मक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घ्यायला हवा, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले. याचवेळी शैक्षणिक संस्थांनीही नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे स्वतःला अद्ययावत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे डॉ. किरण रणदिवे यांच्या बुरशी आणि दगडफुलावर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते करण्यात आली. विरोधी पक्षनेते म्हणून अधिक जबाबदारी वाढल्याची कबुलीही पवार यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेते म्हणून राज्यातील प्रत्येक घटनेची दखल घ्यावी लागते. राज्यातील विकास प्रकल्प आणि उद्योग बाहेर जात आहेत. वाढती बेरोजगारी पाहता, हे प्रकल्प बाहेर जाऊ नये म्हणून लढावे लागते. त्यामुळे आता अधिक जास्त काम वाढले आहे.’’ मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्था, सेवक कल्याण निधी व सेवक सहकारी प्राथमिक ग्राहक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभाही यावेळी पार पडल्या.

पवार म्हणाले...
- उपमुख्यमंत्री पदापेक्षा विरोधी पक्षनेत्याच्या कामात व्यस्तता अधिक
- राज्यातील बेरोजगारी वाढत असून, नवे प्रकल्प बाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न
- सरस्वतीच्या फोटोवरील भुजबळांचे विधान वैयक्तीक, प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार