माहिलांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध ः सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहिलांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध ः सावंत
माहिलांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध ः सावंत

माहिलांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध ः सावंत

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘स्वत:चे अस्तित्व विसरून आपल्या परिवारासाठी माता-भगिनी अविश्रांतपणे झटत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. समाजाला सबल करणाऱ्या माहिला वर्गास दर्जेदार, जलद आणि मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे,’’ असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या पुणे येथील कॅम्पसमध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुंबईचे आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, पुण्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, विद्यापीठाच्या पुणे केंद्राच्या प्रमुख शीतल मोरे, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन देवरे उपस्थित होते. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रूबी ओझा यांनी स्वागत केले.
यानिमित्त राज्यातील सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. प्रास्ताविक राज्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले.