‘आयएसीटीएस’तर्फे हृदयरोग जनजागृती मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयएसीटीएस’तर्फे हृदयरोग जनजागृती मोहीम
‘आयएसीटीएस’तर्फे हृदयरोग जनजागृती मोहीम

‘आयएसीटीएस’तर्फे हृदयरोग जनजागृती मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘द इंडियन असोसिएशन ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन्स’ (आयएसीटीएस) तर्फे ‘रिबर्थ फाउंडेशन’च्या सहकार्याने जागतिक हृदय दिनानिमित्ताने हृदयरोग प्रतिबंध आणि अवयवदानाबाबत सायकल फेरीच्या माध्यमातून जागरूकता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा भाग असलेल्या सायकल फेरीची सुरुवात ‘वायएमसीए’ येथून करण्यात आली. या उपक्रमामध्ये प्रख्यात हृदय शल्यविशारद आणि ‘आयएसीटीएस’चे उपाध्यक्ष डॉ. मनोज दुराईराज, ‘वायएमसीए पुणे’चे सरसचिव प्रवीण मॅकेन्झी आणि रिबर्थ फाउंडेशनचे प्रतीक बाफना सहभागी झाले होते.