‘डेक्कन कॉलेज’मध्ये चर्चासत्र उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डेक्कन कॉलेज’मध्ये  चर्चासत्र उत्साहात
‘डेक्कन कॉलेज’मध्ये चर्चासत्र उत्साहात

‘डेक्कन कॉलेज’मध्ये चर्चासत्र उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १ : केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग देशभरातील १२५ विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या योगदानावर आधारित कार्यक्रम आयोजित करत आहे. याचा एक भाग म्हणून डेक्कन कॉलेज पदव्युत्तर पदवी आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) यांनी ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी वीरांचे योगदान’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. यात प्रा. भास्कर खांडवी यांचे व्याख्यान झाले.
एनसीएसटी सल्लागार राघव मित्तल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आरक्षण सुविधांविषयी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी उपकुलगुरू प्रा. प्रसाद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव खटावकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रा. पांडुरंग साबळे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन डॉ. निशा सावंत यांनी केले. यानिमित्त डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संग्रहालयात छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.