महाराष्ट्र राशिक्षण संस्था महामंडळातर्फे उद्या सांगलीत महाअधिवेशन ज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने महाअधिवेशनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र राशिक्षण संस्था महामंडळातर्फे
उद्या सांगलीत महाअधिवेशन
ज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने महाअधिवेशनाचे आयोजन
महाराष्ट्र राशिक्षण संस्था महामंडळातर्फे उद्या सांगलीत महाअधिवेशन ज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने महाअधिवेशनाचे आयोजन

महाराष्ट्र राशिक्षण संस्था महामंडळातर्फे उद्या सांगलीत महाअधिवेशन ज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने महाअधिवेशनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) सांगली येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महानगर, धनंजय गार्डन येथे सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होणार असून यामध्ये खासगी शिक्षण संस्थांचे आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांविषयी चर्चा होणार असल्याची माहिती महामंडळाचे पुणे विभाग अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष आबेदा इनामदार, इंग्रजी माध्यम उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी, अशोक मुरकुटे, शरदचंद्र धारूरकर, अजित वडगावकर, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. यावेळी इनामदार म्हणाल्या, ‘‘अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील समस्यांशी निगडित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यासाठी अधिवेशनाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगारमंत्री सुरेशभाऊ खाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्‍घाटन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते होणार आहे.’’

अधिवेशनातील काही विषय
- पवित्र पोर्टल रद्द करणे
- वेतनेतर अनुदान १२ टक्के करणे
- २०१२ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना मान्यता देत कायम करावे
- शिक्षण संस्थांना इमारत भाडे पूर्वीप्रमाणे द्यावे
- आरटीई कायदा केंद्राच्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करणे
- नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत संस्थांना येणाऱ्या अडचणी शासनाला अवगत करून देणे