दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशाला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूरस्थ शिक्षणाच्या 
प्रवेशाला सुरवात
दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशाला सुरवात

दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशाला सुरवात

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ (ओपन अँड डिस्टन्स) अध्ययन प्रशालेअंतर्गत ‘एम.ए. व एम.कॉम २०२२’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
विद्यापीठात मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान व शिक्षणशास्त्र या विषयात एम.ए. व एम.कॉम या दूरस्थ अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया प्रशालेच्या ‘http://unipune.ac.in/SOL/’ संकेतस्थळावर शुक्रवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. ऑनलाइन नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन शुल्क भरून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर सायंकाळी पाचपर्यंत आहे. तर अभ्यास केंद्रांवर प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.