‘अस्मिता’ उपक्रमातून मुलींना करणार सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अस्मिता’ उपक्रमातून मुलींना करणार सक्षम
‘अस्मिता’ उपक्रमातून मुलींना करणार सक्षम

‘अस्मिता’ उपक्रमातून मुलींना करणार सक्षम

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः घरगुती अत्याचार, सोशल मीडियावरील छळ, स्वसंरक्षण, स्त्रीरोगविषयक मिथक आणि पोषण आहार यांच्या प्रशिक्षणावर भर देत रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे संस्थेने हॅथवे लिमिडेटसोबत ‘अस्मिता’ या उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. अनेक जिल्ह्यांच्या रोटरी क्लबशी भागीदारी करून महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध शाळा, अनाथाश्रम व संस्थांमधील ३६ हजारांहून अधिक मुलींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे या उपक्रमाचे मुख्य उद्देश आहे. मुलींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अस्मिता उपक्रमामुळे मुलींना आत्मविश्र्वास प्रदान करण्याचा, त्यांना स्वतंत्र, निर्भय आणि धाडसी बनवण्याचा प्रयत्न असल्याचे आरआयडी ३१३१ चे जिल्हा प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी सांगितले.