‘मराठी संगीतकर्मी आणि वन्दे मातरम्’ कार्यक्रमाचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मराठी संगीतकर्मी आणि वन्दे मातरम्’ कार्यक्रमाचे सादरीकरण
‘मराठी संगीतकर्मी आणि वन्दे मातरम्’ कार्यक्रमाचे सादरीकरण

‘मराठी संगीतकर्मी आणि वन्दे मातरम्’ कार्यक्रमाचे सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ला महत्त्वाचे स्थान आहे. पण विष्णू दिगंबर पलुस्कर, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, पं. वि. रा. आठवले आदी मराठी संगीतकर्मींनी ‘वंदे मातरम्’साठी दिलेले योगदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाही दुर्लक्षित राहिले आहे’’, अशी खंत ‘वंदे मातरम्’चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी व्यक्त केली. स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित ‘मराठी संगीतकर्मी आणि वंदे मातरम्’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सबनीस यांनी ‘वंदे मातरम्’च्या विविध दुर्मिळ ध्वनिमुद्रिका तसेच चित्रफितींचे सादरीकरण केले. या रचनांमधून गेल्या १५० वर्षात भारतीय संगीतातील बदलते संगीत प्रवाहही रसिकांना अनुभवता आले. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एमडी. उपस्थित होते.

प्रभा शिवणेकर यांना दुर्गा पुरस्कार प्रदान
पुणे, ता. ३० ः हिंदू महिला सभेतर्फे देण्यात येणारा दुर्गा पुरस्कार यंदा ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातील गंगीची भूमिका अजरामर करणाऱ्या लोककलावंत प्रभाताई शिवणेकर यांना प्रदान करण्यात आला. सभेतर्फे आयोजित ७२व्या नवरात्र महोत्सवांतर्गत झालेल्या कार्यक्रमात वंचित विकास संस्थेच्या संचालिका व कार्यवाह मीना कुर्लेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी लेखक प्रभाकर ओव्हळ, सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले, उपाध्यक्ष यशश्री आठवले आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. मानपत्र, साडी-चोळी आणि मानधन, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अश्विनी करंदीकर आणि सुप्रिया चित्राव यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची अजरामर गीते आणि आठवणींचा ‘फुले वेचिता’ हा कार्यक्रम सादर करून लता मंगेशकर यांना सांगीतिक आदरांजली वाहिली.