मित्राचा खून करणाऱ्या जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मित्राचा खून करणाऱ्या जन्मठेप
मित्राचा खून करणाऱ्या जन्मठेप

मित्राचा खून करणाऱ्या जन्मठेप

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : डोक्‍यात दगडू घालून मित्राचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला.
अब्दुल कय्यूम युसूफ अन्सारी (वय ३९, रा. ओव्हाळवाडी, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पोपट शिवराज गायकवाड (वय ५०) यांचा खून केला होता. पोपट यांची पत्नी काशिबाई (वय ४५) यांनी याबाबत लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी सहा साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. डी. परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून प्रदीप कडूकर यांनी काम पाहिले. ३० एप्रिल २०१८ रोजी वाघोली गावच्या हद्दीत ओव्हाळवाडी रस्त्यावर ही घटना घडली. अब्दुल हा संतोषी नेपाळी नावाच्या महिलेचे दुकान चालवीत होता. काही दिवसांनी महिलेने ते दुकान गायकवाड यांना चालविण्यास दिले. हे दुकान चालविण्यास घेतल्याच्या कारणावरून अब्दुलने गायकवाड यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.