‘एनईपी’मुळे शिक्षणाच्या अमर्याद संधी : डॉ. काळे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ पडला पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एनईपी’मुळे शिक्षणाच्या अमर्याद संधी : डॉ. काळे
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ पडला पार
‘एनईपी’मुळे शिक्षणाच्या अमर्याद संधी : डॉ. काळे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ पडला पार

‘एनईपी’मुळे शिक्षणाच्या अमर्याद संधी : डॉ. काळे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ पडला पार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : आंतरविद्याशाखीय शिक्षण, ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडीट आणि ड्यूअल डिग्रीसारख्या योजनांसारखे अभूतपूर्व बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनईपी) सुचविले आहेत. या शैक्षणिक लवचिकतेमुळे विद्यार्थ्यांपुढे शिक्षणासाठी अमर्याद संधींचे दरवाजे खुले झाले आहेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केले.

शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या १६ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी ‘सीओईपी’चे पहिले कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते. डॉ. काळे म्हणाले, ‘‘एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांनी सामर्थ्य, सत्य, नैतिकता आणि सर्वांसाठी आदर ही नैतिक मूल्ये जोपासायला हवी. अशा विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळेच समाजाला दिशा मिळते. हवामान बदल, आरोग्य, सायबर सुरक्षा, अन्न व पाणी सुरक्षा या वैश्विक आव्हानांवर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कार्य करायला हवे.’’ आव्हानांमध्येच संधी दडल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘‘जेवढी मोठी समस्या तेवढी मोठी संधी, ही शिकवण मी इस्रायली लोकांमध्ये पाहिली आहे. सध्या युरोप आणि जपानमध्ये कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असून, जग आता चीनऐवजी भारताकडे वळू पाहत आहे. तंत्रज्ञान आणि पुरेशा मनुष्यबळामुळे भारतात अनेक संधी निर्माण होत असून, आपल्या कार्यक्षमतेच्या आधारे तुम्ही त्या पादाक्रांत कराव्यात.’’ डॉ. सुतावणे यांनी शैक्षणिक वर्षात सीओईपीने मिळविलेल्या यशाचा लेखाजोखा मांडला. या वेळी बी.टेक, एम.टेक, एमबीए आणि पदवीच्या एक हजार ८८ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली.

सीओईपीची वर्षभरातील कामगिरी
एकूण पदवीप्राप्त विद्यार्थी : १,०८८
बी.टेक.चे सुवर्णपदक विजेते : १०
वर्षभरातील शोधनिबंध : ५२५
‘पीएच.डी.’चे विद्यार्थी : २७१
वर्षभरातील पेटंट : १२
सुरू असलेले प्रकल्प : ७३
भाऊ इन्स्टिट्यूटमधील स्टार्टअप्स : १००

फोटो : 96208, 96205