सीरत कमिटीतर्फे हजरत मोहम्मद(स) पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीरत कमिटीतर्फे हजरत मोहम्मद(स) पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक
सीरत कमिटीतर्फे हजरत मोहम्मद(स) पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक

सीरत कमिटीतर्फे हजरत मोहम्मद(स) पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक

sakal_logo
By

हजरत मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक
पुणे, ता. १ ः हजरत मोहम्मद (स) पैगंबर जन्मदिनानिमित्त सीरत कमिटी, पुणे शहरतर्फे रविवारी (ता. ९) भव्य मिरवणुकीचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीला नाना पेठेतील मन्नुशाह मस्जिद येथून मौलाना हाफिज गुलाम अहमद खान साहेब कादरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ होईल. या मिरवणुकीचा मार्ग संत कबीर चौक, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, निशात टॉकीज, भगवानदास चाल मार्ग-चुडामन तालीम, लष्कर शिवाजी मार्केट, सेंटर स्ट्रीट, कुरेश मस्जिद, महावीर चौक, एम. जी. रोड मार्गे शरबतवाला चौक, साचापीर स्ट्रीट, हमजे खान चौक, गोविंद हलवाई चौक असा असेल. शुक्रवार पेठेतील सुब्हानशाह दर्गाह चौक येथे रात्री नऊ वाजता मिरवणुकीची सांगता होईल. पुणेकर बांधवांनी या भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन हा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन सीरत कमिटीने केले.

शिवम फाउंडेशनतर्फे क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार
पुणे, ता. १ ः शिवम फाऊंडेशन, पुणेतर्फे पं. नेहरू स्टेडियम येथे ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. बाळासाहेब साने, अरविंद ठोंबरे, प्रा. श्याम करंदीकर, संजय गोखले, समिर इंगुलकर, अॅड. दिनकरराव शिंदे, पराग गानु आणि सुनिल नेवरेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश रेणुसे, मोहन गोस्वामी, राजेंद्र तांबेकर, रविंद्र फटाले यांच्या हस्ते सत्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रा. मदन पुरंदरे, जयसिंगराव मोहिते उपस्थित होते. राजेश टिकार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.