प्रसाद हातवळणे बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसाद हातवळणे बेपत्ता
प्रसाद हातवळणे बेपत्ता

प्रसाद हातवळणे बेपत्ता

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः प्रसाद मनोहर हातवळणे (वय ४८, यशदा हाईटस्‌, वारजे) हे १७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. १७ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ते ‘माझे थोडे काम आहे ते करुन येतो’ असे सांगून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ‘मी रावेत पुलावरून आत्महत्या करीत आहे’ असा मेसेज आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रावेत पुलाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. हातवळणे हे अंगाने सडपातळ असून उंची पाच फुट १० इंच इतकी आहे. त्यांना मराठी, हिंदी भाषा येते. त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट परिधान केली आहे. त्यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिस ठाण्यास माहिती द्यावी. संपर्क - ७५८८६७१५११
----------
फोटो नं - ९६११७