नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून
नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून

नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून

sakal_logo
By

पुणे, ता. १ : आर्थिक कारणावरून टोळक्याने एका व्यक्तीला जबर मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरात घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील राधाकिसन नलवडे (वय ५४, रा. भैरोबानाला, फातिमानगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुदाम राधाकिसन नलवडे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील हा लष्कर परिसरात झेरॉक्स मशिन दुरुस्तीचे काम करीत होता. त्याने काही व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. या आर्थिक कारणांवरून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने सुनील यास नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आशापुष्प शाळेजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत रात्री साडेदहा वाजता सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळाली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने सुनील यास उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे तीन वाजता उपचार सुरू असताना सुनील याचा मृत्यू झाला.