शहराच्या अंतर्गत सुरक्षेत जीवरक्षकांचे काम महत्त्वाचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या कृतज्ञता गौरव सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहराच्या अंतर्गत सुरक्षेत जीवरक्षकांचे काम महत्त्वाचे
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या कृतज्ञता गौरव सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादन
शहराच्या अंतर्गत सुरक्षेत जीवरक्षकांचे काम महत्त्वाचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या कृतज्ञता गौरव सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादन

शहराच्या अंतर्गत सुरक्षेत जीवरक्षकांचे काम महत्त्वाचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या कृतज्ञता गौरव सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘‘केवळ सणवार नाही, तर वर्षभर समाजात शांतता राहावी याकरिता पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स आणि अग्निशमन दलातील जीवरक्षक काम करीत असतात. सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक कार्यरत असतात, त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत सुरक्षेचे महत्त्वाचे काम अग्निशमन दल करते,’’ असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती ‘श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट’तर्फे नूमवि शाळेच्या सभागृहात अग्निशमन दल अधिकारी व जीवरक्षकांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. या वेळी महापालिका उपायुक्त माधव जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पराग ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, ऋग्वेद निरगुडकर, प्रसाद कुलकर्णी, विवेक खटावकर, अनिल सकपाळ, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, राजेश दातार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि विनायक कदम या वेळी उपस्थित होते.

अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्यासह जीवरक्षकांचा सन्मान या वेळी करण्यात आला. तसेच श्री तुळशीबाग गणपती मंडळात वर्षभर सेवा देणाऱ्यांनादेखील गौरविण्यात आले. ‘श्रीं’ची प्रतिमा, महावस्त्र व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जातो. या प्रसंगी पाटील म्हणाले, ‘‘कोठेही दुर्घटना होवू नये व झाल्यास त्याचे त्वरित निराकरण व्हावे, याकरिता महत्त्वाची भूमिका अग्निशमन दल बजावते. त्यांच्या कार्याचा सन्मान आपण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना अद्ययावत साधनेदेखील पुरविणे आवश्यक आहे. अग्निशमन दलासह पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व कुटुंबांकरिता कायमस्वरूपी काम उभे राहायला हवे. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

दान आलेला पैसा समाजासाठी खर्च करावा
दान स्वरूपात गणेश मंडळांकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो. या दानाच्यामाध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्यदेखील सुरू असते. या पैशाची साठवणूक व बचत न करता, हा सगळा पैसा समाजासाठी खर्च करायला हवा. समाजासाठी खर्च करून पुण्याचे सर्व प्रकारचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

95989