अखिल भारतीय कला स्पर्धेत पुण्यातील १२ विद्यार्थ्यांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखिल भारतीय कला स्पर्धेत पुण्यातील १२ विद्यार्थ्यांना यश
अखिल भारतीय कला स्पर्धेत पुण्यातील १२ विद्यार्थ्यांना यश

अखिल भारतीय कला स्पर्धेत पुण्यातील १२ विद्यार्थ्यांना यश

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : गुजरात भावनगर येथील मारुती ॲकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय कला स्पर्धेत पुण्यातील १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
कार्टून, ग्रीटिंग कार्ड आणि पेंटिंग अशा तीन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर नुकतीच ही स्पर्धा झाली. यात आर्ट एज्युकेशन संस्थेच्या १२ जणांनी विविध बक्षीसे जिंकली. विजेत्यांमध्ये आदिश रमेश शिंदे व अमिया अनुप बार (पेंटिंग) यांना बालरत्न पुरस्कार मिळाला. प्रथा जाधव, आरोह आर. परमार व प्रियंजना पॉल (ग्रीटिंग कार्ड), आदेश रमेश शिंदे व प्रियंजना पॉल (कार्टून), अमृता ए. मेंडन, श्रेया सील, वंश ठाकूर आणि प्रांजवी बाप्पासाहेब काळे (पेंटिंग) हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. निखिल कुलकर्णी ( ग्रीटिंग कार्ड) याला रौप्यपदक मिळाले. आर्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूटला शासकीय पुरस्कार आणि दोन कला शिक्षकांना बालरत्न पुरस्कार आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आल्याचे पुनम राणा यांनी सांगितले .